HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेची ‘अबोली रिक्षा’

ठाणे | महाराष्ट्रात सद्यस्थितीला कोरोनाबाधितांचा आकडा हा १५९ वर पोहोचला आहे. तासागणिक रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. परंतु, राज्य सरकार, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच डॉक्टरर्स, नर्सेस सगळेच जण दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे आणि त्यामूळे असलेल्या लॉकडाऊनमूळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने शिवभोजन थाळी नंतर आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून (२८ मार्च) ठाणे शहरातील रुग्णांच्या मदतीला शिवसेनेचे अबोली रिक्षाचालक रस्त्यावर उतरणार आहेत. एकूण २५ अबोली रिक्षा वेगवेगळ्या विभागात नागरिकांना ही सेवा देणार आहेत.

शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि नेतृत्वातून ही सेवा दिली जाणार आहे. दरम्यान, रस्त्यावर खाजगी वाहतूकीला बंदी असल्याकारणाने जर कोणाला तातडीने रुग्णालयात न्यायचे असल्यास नागरिकांना त्रास होत आहे. त्यामूळेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबोलीची रिक्षा सेवा सुरू केली आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, माजीवडा विभाग, कॅडबरी परिसर, टेम्भी नाका या परिसरात ही अबोली रिक्षा रुग्णांना सेवा देणार आहेत. रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही सेवा सुरू राहणार आहे. ज्यांना या रिक्षाची तातडीने मदत हवी असेल त्यांनी विनायक सुर्वे ९९६७३१२१७६ व अनामिका भालेराव ८४५२१८४५५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १५९ वर गेली आहे. त्यापैकी मुंबईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे ६ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात कोरोनाचे कोरोनबाधितांची संख्या ८३४ वर पोहोचली असून देशात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी पाठपुस्तकात आता गुजराती ?

News Desk

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई! – राजेश टोपे

Aprna

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,काय तक्रार केली ?

News Desk