HW News Marathi
देश / विदेश

संसदेबाहेरील स्वच्छता मोहिमेवरून हेमा मालिनी ट्रोल, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शनिवारी (१३ जुलै) संसद भवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लायांसह भाजपच्या अनेक दिग्गज मंत्र्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानात भाजप खासदार अभिनेत्री हेमा मालिनी, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर या देखील सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, संसदेबाहेरील या स्वच्छता अभियानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटीझन्सनी हेमा मालिनी यांना प्रचंड ट्रॉल केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने संसद भवन परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेत भाजपचे अनेक मंत्री आणि खासदार सहभागी झाले होते. “हेमा मालिनी या खरंच स्वच्छता करत आहेत कि अभिनय करत आहेत ?”, असा सवाल नेटीझन्सकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे, “हेमा मालिनी यांचा झाडू जमिनीला देखील लागत नाही”, असे म्हणत नेटिझन्सकडून हेमा मालिनी यांच्याकडून खिल्ली देखील उडविली जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आलोक वर्मांना सीबीआयच्या संचालकपदावरून पुन्हा हटविले

News Desk

महाराष्ट्रातून ‘या’ ४ जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागली लॉटरी

News Desk

सुरक्षा हटविल्यानंतर फुटीरवादी नेता यासिन मलिकला अटक

News Desk