HW News Marathi
महाराष्ट्र

दिशाहीन काँग्रेससोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार !

मुंबई | विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एक महिना झाला तरीही काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत वाटाघाटी करायची झाली तर ती कुणासोबत करणार ?” असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे “दिशाहीन काँग्रेससोबत न जाता आम्ही आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिली आहे.

“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीचा एजेंडा स्पष्ट नाही. मात्र आमचा एजेंडा सर्वांनाच माहित आहे. त्याचा प्रत्यय येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. विधानसभेत आमच्यामुळे अन्य आघाड्यांना फटका बसेल”, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे येत्या विधानसभेत राज्यातील एकूण २८८ जागांपैकी किमान एक तृतीयांश जागांवर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर देखील प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यातील भेटीचा राजकारणावर किंवा मतांवर कोणताही परिणाम होणार नाही. मनसेची ओळख उत्तर भारतीय विरोधी पक्ष अशी आहे. म्हणूनच, काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास तयार नाही. कारण, त्यामुळे काँग्रेसच्या मतांवर त्याचा परिणाम जाणवू शकतो”, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने

News Desk

संभाजी भिडे गुरूजींना मुख्यमंत्री पाटीशी घालत आहेत | राजा ढाले

News Desk

अमित साटम यांनी PAP घर खरेदीत भ्रष्टाचार केल्याबद्दल सेनेला फटकारले

Aprna