HW News Marathi
महाराष्ट्र

गारपिटीमुळे पोपटांनी प्राण गमावले

गोंदिया | भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शिव मंदिरच्या परिसरातील झाडांवर हजारो पोपटांचे वास्तव्य होते. मात्र गुरुवारची तूफान गारपीट त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. लिंबाच्या आकारा ऐवढ्या गाराचा पडल्यामुळे या परिसरातील बहुतांश पोपटांचा मूत्यू झाला तर काही जखमी झाले.

वन विभागांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या पोपटांपैकी ४६० दुर्दैवी अंत आहे. वन विभागामार्फत सर्व पोपटांचे मृतदेह जमिनीत पुरण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. विदर्भात गारपिटीमुळे शेतातील पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा मोठा फटका जनावर आणि पक्ष्यांवर झालेला आहे. तर काही ठिकाणी पक्षी जनावरे जखमी झाले आहेत.

तसेच गोंदियाचे पालक मंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शेताची पाहणी करुन तहसीलदारांना पंचनामा करुन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थकीत वीजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत होणार!

News Desk

शिवसेनेच्या गैरहजेरीत कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

“मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता पण आता…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk