HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : आयकर, जीएसटी परतावा भरण्याची मुदत ३० जून, अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशात अर्थसंकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहे. यानुसार २०१८-१९ आर्थिक वर्षकरत आयकर परताव्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आयकर परतावा भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

तसेच आधार कार्ड-पेन कार्ड लिंक करण्याची मुदत देखील ३० जनूपर्यंत करण्याची माहिती सीतारामण यांनी आज (२४ मार्च) पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. तसेच उशीरा दंड भरणाऱ्यांसाठी १२ ऐवजी ९ टक्के दंड असणार आहे. मार्च, एप्रिल, मेचा जीएसटी परतावा भरण्याची तारीख ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान,याशिवाय मार्च, एप्रिल, मे महिन्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतही वाढवून ३० जून करण्यात आली आहे. ‘विवाद से विश्वास’ ही योजनेलाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणानंतर शेअर बाजारता मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ११०० अंकांनी वधारला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

गर्भपाताचा परवानगी नाकरलेली ‘ती’ने दिला बाळाला जन्म

News Desk

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

News Desk