HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर | मंत्रालयात सुरु असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी एका बाजूला महाराष्ट्र हादरून गेला आहे, तर दुसरीकडे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय घरासमोर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित व्यक्ती ही सरकारी कर्मचारी कर्मचारी असून त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थान असणाऱ्या बंगल्यासमोर हा सर्व प्रकार घडला आहे. संबंधित व्यक्ती ही नागपूर महापालिकेत कार्यरत होती. मात्र त्यांना अनुशासनात्मक कारवाई करुन नोकरीवरुन काढून टाकण्यात आल असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेल्या सात जणांनी पत्रकार परिषद घेत कामावर न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प! – दीपक केसरकर

Aprna

PandharpurElection : पंढरपुरात भाजप आघाडीवर, समाधान आवताडे विजयाच्या उंबरठ्यावर

News Desk

‘मोदी एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना!

News Desk