HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे शहरातील वाहतूक ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद

पुणे | पुण्यात कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेत पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील वाहतूकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत ३१ मार्चपर्यंत पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. आजपर्यंतचा वाहतुकीसंदर्भातील हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये जमाव बंदी करण्यास सुरुवात केली आहे. काल (२२ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात जमावबंदी लागू केल्यानंतर आज (२३ मार्च) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग हे दोन महत्त्वाचे महामार्ग जे मुंबई आणि पुण्ययाला जोडतात ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

या मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्यांनाट सोडले जात आहे. यासाठी खारघर, कळंबोली अशा नाक्यांवर पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. जर ती व्यक्ती अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी नसेल, तर तिला पुन्हा माघारी पाठवले जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या महामार्गाला बंद केल्यानंतर पोलिसांनाच्या नाकी नऊ आले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna

भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात…..

Arati More

कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna