HW News Marathi
राजकारण

कर्नाटक सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना ?

बंगळुरू | काँग्रेस- जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज (८ जुलै) काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिला आहे. या सर्व मंत्र्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहे. यामुळे कर्नाटकात राजीनामा दिलेल्या आमदारांना मनविण्यासाठी लवकरच नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.

कर्नाटकातील सकारची स्थिती आधीपासूनच नाजूक स्थितीत असून एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची शक्यता शनिवार (६ जुलै)पासून निर्माण झाली. कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकचे राजकारणाचे राजीनामे देऊन सरकारची कोंडी केली.

आघाडीच्या नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने या संधीचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा कर्नाटकात भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी हलचाली करत आहेत.कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचेच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मविआ’सारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढतोय!

Aprna

शिवसेनेचा स्वतंत्र गट करण्यासाठी 12 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

News Desk