नवी दिल्ली | “काँग्रेसमध्ये राजीनामा सत्राची सुरुवात राहुल गांधी यांनीच केली. त्यांच्यानंतर अन्य नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली”, असे विधान भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. “भाजपला विरोधी पक्षांचे सरकार मान्य नाही. कर्नाटक सरकारमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला भाजप जबाबदार आहे”, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे विधान केले आहे. मात्र, कर्नाटकमधील या परिस्थितीस भाजप नव्हे तर स्वतः राहुल गांधीच जबाबदार असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Rajnath Singh: We're committed to maintaining dignity of parliamentary democracy. Trend of submitting resignations was started by Rahul Gandhi in Congress,it wasn't started by us. He himself asked people to submit resignations,even senior leaders are submitting their resignations https://t.co/xYr87k6qEJ
— ANI (@ANI) July 8, 2019
“राहुल गांधी यांनीच राजीनामा देण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे याच्याशी काहीही देणेघेणे नाही. कर्नाटकच्या राजकीय अस्थिरतेत भाजपचा हात नाही. कोणाला आमिष दाखवून पक्षांतर करण्याचा आमचा इतिहास नाही”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
“कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजप जबाबदार असून भाजपने कर्नाटकमध्ये लोकशाहीची हत्या केली आहे. भाजपला विरोधी पक्षांचे सरकार असणे मान्य नाही. म्हणूनच, त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी पक्षांतराचे प्रयत्न सुरु केले आहेत”, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार ठरविले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.