HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने सेल्फ कोरोंटाईनमध्ये

नागपूर | बॉलिवूडची गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्या सानिध्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचे किंवा सेल्फ कोरोंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिका कपूरच्या पार्टीत भाजपचे खासदार दुष्यंत सिंह गेले होते आणि यांच्या संपर्कात आल्याने शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी कोरोनाबाबत सावधगिरीचा उपाय म्हणून स्वतःला घरातच विलग केले आहे. संसदेच्या परिवहन, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या स्थायी समितीची बैठक १९ मार्चला झाली होती. यात खासदार तुमाने बराच वेळ दुष्यंत सिंग यांच्या शेजारी होते. यानंतर सिंग कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याचे समोर आले. त्याच रात्री नागपूरला निघताना तुमाने यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतःहून सावधगिरी बाळगली.

नागपूरात गेल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा शल्य चिकित्सकांना स्वतःबद्दल माहिती दिली. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार व सूचनांचे पालन केले. गेल्या तीन दिवसांपासून ते कुणाच्याही संपर्कात आले नाहीत. तसेच, संपूर्ण घर सॅनिटाइज करण्यात आले आहे. ‘दिल्लीहून परतल्यानंतर कुणालाही भेटलेलो नाही. तथापि, सर्वसामान्यांची कामे फोनवरून करण्यात येत आहेत. फोनवर होण्यासारखी कामे लगेच करत असलो तरी कार्यकर्त्यांचीदेखील भेट टाळत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी भेटीस येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कुणीही येऊ नये, असे तुमाने यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ मार्च) दुपारी भ्रमणध्वनीवरून खासदार कृपाल तुमाने यांच्याशी संपर्क साधला. प्रकृतीविषयी विचारपूस केल्यानंतर त्यांनी तुमाने यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, भाजपकडूनच मागणी

News Desk

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

News Desk

राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ, राज्य राखीव दलातील 7 तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात

Aprna