नवी दिल्ली | कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि काँग्रेस आघाडीचे सरकार मोठा फटका बसला आहे. सत्ताधारी पक्षाच्या ११ आमदार राजीनामा सोपवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले होते. देण्यासाठी विधानसभेत पोहोचले आहेत. मात्र अध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांनी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला. या कर्नाटकात राजकीय भूकंपानंतर भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एम. येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन करायला तयार असल्याचे सांगितले आहे.
BS Yeddyurappa, BJP: We are closely watching political developments in Karnataka. One thing I can say is that people are not ready for elections. Elections are a burden on state exchequer. If situation arises we'll definitely explore constitutional provisions to form next govt. https://t.co/zaRgLiGvFl
— ANI (@ANI) July 6, 2019
‘काँग्रेस जेडीएसच्या आमदारांनी जे केले त्यात भाजपचा हात नाही. आम्हाला हे सर्व प्रसार माध्यमातून समजले आहे. आम्हाला त्यावर काही बोलायचे देखील नाही. आम्ही सध्या कर्नाटकातील राजकीय स्थितीचे निरिक्षण करत आहोत. सध्या एक गोष्ट नक्की आहे की कर्नाटकातील जनता पुन्हा एकदा निवडणुकांसाठी तयार नाही. पुन्हा निवडणूक घेणे म्हणजे सरकारी तिजोरीवर बोजा पडले. जर ही परिस्थिती आणखी बिघडली तर आम्ही संविधानतील तरतुदींनुसार सरकार स्थापन करू’, असे येडीयुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.