HW News Marathi
देश / विदेश

मोदीने ७ हजार ३०० कोटी व्याजासह पीएनबीला परत करण्याचे न्यायालायचे आदेश

पुणे | पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रूपयांचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला पुण्यातील कर्ज वसुली लवादाने (डीआरटी) मोठा धक्का दिला आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद केला होता. यानंतर बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश डीआरटीने दिला आहे. न्यायालयाने आज (६ जुलै) या प्रकरणी निकाल दिला आहे.

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करून ४८ वर्षीय नीरव मोदी भारताबाहेर पसार झाला आहे. याप्रकरणी सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू असून मोदी आणि या घोटाळ्यातील त्याचा साथीदार मेहूल चोक्सीची ४ हजार ७६५ कोटींची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. बँकेने मोदीविरोदात तीन दावे दाखल केले असून त्यापैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षाला मोठ्या बदलांची गरज, सोनिया गांधींना नेत्यांनी २३ लिहिले पत्र

News Desk

भाजप नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी केली हत्या

News Desk

‘हर बॅटलमें अटल’ अमूल कडून वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk