HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील ‘या’ भागातील दुकाने दिवसाआड राहणार बंद

मुंबई | कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येकडे पाहता सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे झाले आहे. हीच गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे आणि गजबजलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

मुंबईत टप्प्याटप्प्याने दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही भागातील दुकाने ही एक दिवस तर काही भागातील दुकाने ही एकदिवस अशी दिवसाआड दुकाने बंद असणार आहेत. तसेच मेडिकलची दुकाने आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तुंची दुकाने ही रोज सुरु असणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कोणत्या वारी कोणत्या भागातील दुकाने सुरु असणार ?

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार –

दादर

न. चि. केळकर मार्ग (पूर्व बाजू)

डिसिल्व्हा रोड

छबिलदास रोड

एस. के. बोले मार्ग (दक्षिण बाजू)

सेनापती बापट रोड (कोहिनूर इन्स्टिट्यूट ते हॉकर्स प्लाझा)

माहीम

टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल)

लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)

धारावी

९० फूट रोड (पश्चिम बाजू-६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग)

आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)

महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू)

 

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार –

दादर

न. चिं. केळकर मार्ग (पश्चिम बाजू)

मो. चि. जावळे मार्ग (भवानी शंकर रोड पालिका शाळेपर्यंत)

रानडे रोड

एस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)

माहीम

टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल)

लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)

धारावी

९० फूट रोड (पश्चिम बाजू-६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग)

आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)

महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही’, फडणवीसांचा गंभीर आरोप!

News Desk

बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

News Desk

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk