HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यासांठी खुशखबर

मुंबई | मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यासांठी एक खुशखबर आहे. एसटी महामंडळाने. मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीचीची सेवा असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात तब्बल ८० ते १२० रुपयां पर्यंत भरगोस कपात करण्यात आली आहे. त्यासंर्दभातील घोषणा परिवहन मंत्री, व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. हे नवे तिकीट दर येत्या सोमवार ( ८ जुलै) पासून लागू होणार आहेत.

मुंबई-पुणे या मार्गावर गेल्या १५ वर्षांपासून एसटीची शिवनेरी ही बससेवा सुरू आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात. याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना सेवा पुरविली जाते. या बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा मागचा उद्देश असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला आणि उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवासीवर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

शिवनेरीचे नवीन तिकीट दर

मार्ग सध्याचे तिकीट दर नविन तिकीट दर तफावत
दादर-पुणे स्टेशन(औंध मार्गे) रु 520 रु 440 रु 80
दादर-पुणे स्टेशन(पिंपरी-चिंचवड मार्गे) रु 520 रु 440 रु 80
दादर-स्वारगेट रु 540 रु 460 रु 80
ठाणे स्वारगेट(ऐरोली मार्गे) रु 520 रु 440 रु 80
बोरिवली-स्वारगेट( सायन मार्गे) रु 615 रु 525 रु 90
बोरिवली-स्वारगेट(पवई मार्गे) रु 615 रु 525 रु 90
पुणे-औरंगाबाद रु 775 रु 655 रु 120

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार हि दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार पासून कमी झालेले नविन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल परब हे रोज तेच शिळं बोलतात!”, पडळकरांचा परबांना टोला

News Desk

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Aprna

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk