HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : पुण्यातील रेस्टॉरंट-बार उद्यापासून तीन दिवस बंद

पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुण्यातील रेस्टॉरंट आणि बार उद्यापासून (१८ मार्च) दिवस बंद ठेवण्याचा आदेश पुण्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल असोसिएशन आणि पुणे पोलीस यांच्या बैठकीत झाला आहे. पुण्यात शुक्रवार (२० मार्च) पर्यंत रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार आहेत. राज्यामधील पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १६ वर गेली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे रेस्टॉरंट आणि हॉटेल असोशिएशन आणि पुणे पोलिसांची आज (१७ मार्च) बैठक पार पडली. या बैठकीत उद्यापासून तीन दिवस पुण्यात रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

तसेच राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३८वर गेली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी रेस्टॉरंट आणि बार तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पुणे रेस्टॉरंट आणि हॉटेल असोसिएशन घेतला आहे. दरम्यान, पुण्यातील बाजारपेठा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशने काल (१६ मार्च) घेतला आहे. या निर्णयानुसार लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठेसह शहरातील सर्व बाजारपेठा आज (१७ मार्च) ते गुरुवारी (१९ मार्च) बंद ठेवणार आहे. यात औषध, अन्नधान्य-भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच बाजारपेठा बंद राहणार नआहते.

मुंबईमध्ये रविवारी (१५ मार्च) जमावबंदी लागू केल्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. या ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे. पुण्यातील तुळशीबाग येथे विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पुण्यातील सर्व नागरिक गर्दी करतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून पुण्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने १२५ पथके तयार केली असून एका पथकामध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचे कामही पथक करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

कुख्यात गुंड गजानन मारणेला सातारा जिल्हयात अटक…

News Desk

भाजपचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून- अशोक चव्हाणांना विश्वास

News Desk