नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनाम्यावर राहुल गांधी ठाम असल्याची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरून दिली आहे. मात्र त्यांच्या ट्वीटवर उत्तर देताना राहुल गांधी यांनी आपण अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना मात्र यात अद्याप यश आलेले नाही.
We firmly believe that only he can lead the party in the current scenario, his commitment towards well being of our country and countrymen is un-compromised and unmatched.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) July 1, 2019
राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री करणार आहेत. सर्व त्यांची आज (१ जुलै) भेट घेतली आहेत. राहुल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांची ही पहिली भेट असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदावर गांधीशिवाय कोण याचे रहस्य कायम आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. अशा परिस्थिती काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यासोबतची राहुल गांधीची बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
BJP did manage to hide their huge failures behind their fanatic nationalism wd help of enormous resources n govt machinery at hand. But,in spite all odds,it’s no secret how amidst opposition,only Congress Prez did his best to make it an issue based election n took BJP head on
2/2— Ashok Gehlot (@ashokgehlot51) July 1, 2019
यापूर्वी आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले असल्याचे देखील गेहलोत यांनी ट्वीट करत सांगितले. “भाजपने देशभक्तीच्या नावाखाली सरकारी सामग्री आणि आर्थिक संसाधनांचा वापर करत आपले अपयश लपवले. परंतु असे असतानाही काँग्रेस अध्यक्षांनी मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढवत कशाप्रकारे भाजपाला कडवी झुंज दिली हे जग जाहीर असल्याचे गेहलोद यांनी ट्वीट करत सांगितले.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.