HW News Marathi
महाराष्ट्र

नागपुरातही १ कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह

नागपूर | पुण्यात कोरोनाचे ८ आणि मुंबईत २ रुग्ण आढळले असतानाच आता नागपुरातही १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. हा रुग्ण अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी परतला होता. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागपुरातील ११ संशयितांपैकी ९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचे वय ४५-५० च्या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, या व्यक्तीच्या सान्निध्यात कोण कोण आले याचा प्रशासन शोध घेत असून लागण झालेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूरकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नेमकी कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे हे प्रथमदर्शी समजणे कठीण असल्याने सगळ्यांपासून दूर राहणे उत्तम असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. तसेच, स्विमिंग पूलचा देखील वापर देखील टाळावा आणि शक्यतो आपली काळजी घ्यावी असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला दुष्काळ घोषित करुन पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

खूप अडचणी आल्या मात्र अनुभव सुखद होते, राम मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी खडसेंनी आठवणींना उजाळा दिला

News Desk

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय महाराष्ट्र सरकारचा नाही! – जयंत पाटील

News Desk