HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज, फौजिया खान मात्र प्रतिक्षेत

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती आज (११ मार्च) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शरद पवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान यांनी अद्याप अर्ज भरला नाही. फौजिया खान यांनी अर्ज दाखल न केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

या चौथ्या जागेसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. मात्र, तरीही काँग्रेस राज्यसभेतील चौथ्या जागेसाठी आग्रही असल्यामुळे समन्वय समितीची बैठक होणार आहे. परंतु शिवसेनेने आपल्या उमेदवारवर सस्पेंस ठेवला आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार (१३ मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचे बोलले जात होते.

ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठ देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे उद्या (१३ मार्च) भाजपकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित मानले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प. बंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवारावर हल्ला तर माध्यमांच्याही फोडल्या गाड्या 

swarit

कर्नाटकातील एका बंडखोर आमदरांचे मन वळविण्यास शिवकुमारांना यश

News Desk

मध्य प्रदेशमधील बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजपची सर्वोच्च न्यायालयात याचिका

swarit