HW News Marathi
देश / विदेश

इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मोहित कंबोज यांची फेरनिवड

मुंबई | इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहित कंबोज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे युवा नेते व भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष असलेल्या कंबोज यांच्या निवडीचे व्यापार्‍यांमधून व राजकीय वर्तुळातून अभिनंदन केले जात आहे.

देशातील सोने व्यापारी व दागिन्यांच्या क्षेत्रातील सर्वात मोठी व शंभर वर्षे जुनी संस्था असलेल्या इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनचे या क्षेत्रात मोठे नाव आहे. असोसिएशनच्या सदस्यांनी एकमताने कंबोज यांची अध्यक्षपदी फेरनिवड केली. असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची व सदस्यांची वार्षिक बैठक बुधवारी जवेरी बाजार येथील कार्यालयात झाली.

त्यामध्ये सन 1919 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात राष्ट्रीय अध्यक्षपदी कंबोज यांची निवड करण्यात आली. ज्वेलरी व्यावसायिकांच्या समोरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामधून मार्ग काढण्यासाठी संघटनेला कंबोज यांच्या रूपाने तरूण, उर्जावान व कार्यक्षम अध्यक्ष असणे काळाची गरज होती त्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुकेश मेहता यांनी कंबोज यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व त्याला सर्व सदस्यांनी व कार्यकारिणी सदस्यांनी मंजुरी दिल्याने कंबोज यांची निवड घोषित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण संघटनेच्या शतकमहोत्सवी वर्षात अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर कंबोज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सोने व्यापारी, दागिने व्यापारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण तत्पर असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण सर्वस्व झोकून काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या संस्थेला नवीन ओळख मिळवून देण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने तत्पर राहू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये २०० गोमातांचा भूकबळी

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही !

swarit

हैदराबादला पावसाने धुतले

News Desk