श्रीनगर | जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शोपिया येथील मुगल रोडवर आज (२७ जून) दुपारी एक वाजताच्या सुमार मिनी बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ९ मुलींचा समावेश आहे.
Jammu and Kashmir: 11 people died and 6 were injured after their vehicle fell into a deep gorge near Peer Ki Gali in Shopian district, today. The injured have been shifted to hospital. pic.twitter.com/n0TCH1kxIK
— ANI (@ANI) June 27, 2019
शोपिया जिल्ह्यातील मुगल रोडवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या स्कुटरला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. यात ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सर्व विद्यार्थ्यी कॉम्यूटर कोचिंग क्लासवरून परत येत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेमध्ये ७ जण जखमी झाले असून त्यांना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दु:ख व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे मला अतिव दु:ख झाले आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ असे म्हणत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांनी ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.