HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता, मराठ्यांना आरक्षण !

मुंबई | मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि नोकरी १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल आज (२७ जून) मुंबई उच्च न्यायालायने दिला आहे. “ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हणाले.” पुढे मुख्यमंत्री असे देखील म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी दोन्ही सभागृहाने साथ दिली त्याचे मी आभार मानले.”

राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधातील आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे कमी कालावधीत हा अहवाल दिला. या अहवालनुसार न्यायालयाला आरक्षण देण्यास मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आंदोलनाचे समन्वयक, शिवसेना, विरोधी पक्ष या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात आभार मानले. विधानसभेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले, त्यावेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांची घेणार भेट!

News Desk

काँग्रेसच्या नगरपालिका आणि महानगरपालिकांना निधी कमी मिळाला, कॉंग्रेसची पुन्हा एकदा नाराजी

News Desk

“चला आपण एकत्र केंद्राकडे जाऊ”,अजित पवारांची फडणवीसांना साद

News Desk