HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणे महत्वाचे होते !

मुंबई | “मराठा समाजाला प्रचंड मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या या आरक्षणाबद्दल मला आनंद होत आहे. किती टक्के आरक्षण मिळणार हा मुद्दा दुय्यम होता. हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकणं महत्वाचं होतं. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२७ जून) मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवत या समाजाला शिक्षण क्षेत्रात १३% तर नोकरीत १२% आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर, मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाचे आभार मानत मराठा समाजाचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे देखील विशेष आभार मानले. “संभाजीराजे यांनी मराठा समाजातील आंदोलकांना ज्यापद्धतीने मुद्दा पटवून दिला त्यामुळे मराठा समाजानेही न्यायालयीन निकाल येईपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे, मी संभाजीराजे भोसले यांच्यासह अन्य मराठा संघटकांचे देखील आभार मानतो” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यावेळी, मराठा समाजाला पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १६% आरक्षण देणे शक्य नसल्याचे सांगत मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात १२% आणि नोकरीत १३% आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र

News Desk

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk

“आता मी भाजपला ताकद दाखवतो”, खडसेंची भाजपविरुद्ध गर्जना

News Desk