मुंबई | येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटक केले आहे. कपूर यांनी तब्बल ३१ तास चौकशी केल्यानंतर त्यांना आज (८ मार्च) पहाटे ४ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली असून यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कपूर यांच्याविरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कपूर घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती. त्यानंतर कपूर यांच्याविरोधाथ लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
Mumbai: Enforcement Directorate officials along with #YesBank founder Rana Kapoor leave from ED office; He will be produced before a Mumbai court later today pic.twitter.com/Re9VvaDtRe
— ANI (@ANI) March 8, 2020
दरम्यान, अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. २०१७ मध्ये राणा यांनी जवळपास ६३५५ कोटींची कर्ज वाटप केल्याचे उघड झाले आहे. कपूर यांना काल (७ मार्च) दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आले होते.
आरबीआयचे येस बँकेवर निर्बंध
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर ५ मार्चला अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार निर्बंध आणले. यानुसार येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. येस बँकेवरील हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना येस बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.