HW News Marathi
मुंबई

पारसी जनरल रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देऊ, विजय कांबळेंची ग्वाही

मुंबई :कॅम्पस कॉर्नर येथील बी. डी. पेटीट पारसी जनरल रुग्णालयाच्या कर्मचाºयांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याची ग्वाही श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस व कामगार नेते विजय कांबळे यांनी दिली. रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी नुकतेच श्रमिक उत्कर्ष सभेचे सभासदत्व स्वीकारले. कामगारांचे संरक्षण करण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.

यावेळी झालेल्या सभेत कांबळे बोलत होते. या ठिकाणी कार्यरत असलेल्या पूर्वीच्या संघटनेने कामगारांच्या व कर्मचाºयांच्या हिताचा विचार केला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संघटना कार्यरत असल्याने रुग्णायलाचे व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाºयांचे सलोख्याचे संबंध तयार झाले होते. मात्र त्याचा फटका कामगारांच्या हिताला बसू लागल्याने कामगारांनी श्रमिक उत्कर्ष सभेला नेतृत्व करण्याची विनंती केली. आता या ठिकाणी आमची संघटना कार्यरत झाली असून कर्मचाºयांच्या समस्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कर्मचाºयांना न्याय मिळवून देणे ही आमची प्राथमिकता असून कर्मचाºयांचा लढा लढण्यासाठी संघटना पूर्णत: तयार असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

News Desk

फोन टॅपमुळे सेनेच्या उपविभागप्रमुखांची हकलपट्टी

swarit

सरकारला धनगर समाजाला आरक्षण दयायचंच नाही !

News Desk