HW News Marathi
देश / विदेश

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

नवी दिल्ली | तेलुगु देसमच्या राज्यसभेतील चार सदस्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांच्या प्रवेशावर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकू नये. यासाठी टीडीपीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या खासदारांना भाजपमध्ये पाठविले असल्‍याचा टीका वायएसआर काँग्रेसने केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या टीडीपी खासदारपैकी तिघे खासदार हे चंद्राबाबूंसाठी बेनामी म्‍हणून काम करत असल्‍याचा आरोप वायएसआर काँग्रसेचे संसदीय पक्षनेते व्ही. विजयसाई रेड्डी यांनी केला आहे. ही निकाल-निश्चिती आहे, असा आरोप त्यांनी केला. चंद्राबाबू सुट्टीवर कोठे गेले आहेत. हेदेखील पक्षनेत्यांना माहीत नाही, याबद्दल त्यांच्‍याकडून आश्चर्य व्यक्त केले आहे.

चंद्राबाबूंच्या निवासस्थानी के. कला वेंकट राव यांच्या अध्यक्षतेखाली तेलुगु देसमची बैठक पार पडली. चंद्राबाबू सध्या सुट्टीवर युरोपमध्ये आहेत. भाजपमध्ये चार खासदारांचे विलीनीकरण लोकशाहीविरोधी आहे, असे मत आंध्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते येनमला रामकृष्ण नायडू यांनी व्यक्त केले. राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी भाजप अशा मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. चंद्राबाबूंना अडचणीत आणण्यासाठी हे सगळे प्रकार आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएमसीसह ९ बँका बंद होणाऱ्या अफवांचे आरबीआयकडून खंडन

News Desk

चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले जाणार नाही

News Desk

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Aprna