HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. या महासभेत संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले देश अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सह प्रतिनिधी आहेत. या महासभेत या प्रस्तावावर चर्चा होऊन 2014 मध्ये त्याला मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारताबरोबरच जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीमध्ये योग्य संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथातही केलेली आढळते प्रमाणे पतंजली मुनींनी योगा सुत्रा द्वारे मानवाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. भारतात जवळपास 5000 वर्ष पुरातन अशा आध्यात्मिक प्रथेचा रूपात योगाला स्वीकारण्यात आला आहे. योगाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली होती असे सांगण्यात येते ज्यावेळी लोक आपले शारीरिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी ध्यानधारणा करत होते.

योग दिवस साजरा करण्याचे उद्देश

1) योगाच्या अद्भुत आणि प्राकृतिक पायदान बाबत

2) लोकांमध्ये जागृती निर्माण करणे

3) योगाभ्यासाद्वारे लोकांना प्रकृतीशी जोडणे

4)योगाद्वारे ध्यानधारणेची चांगली सवय लावणे

5) योगाचे सर्व फायदे आणि भारतीय प्राचीन योगाकडे जगाचे लक्ष वेधणे

6)जगभरातील आभार आत्मक रोगराईचा दर घटवणे

7) व्यस्त दिनचर्येतून एक दिवस स्वास्थ्यासाठी काढून सर्व 8मानव समुदायांना एकत्र आणणे

9) नियमित योग अभ्यासाद्वारे सास त्यासंबंधी आव्हानांना तोंड देणे

10) लोकांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्य आणि स्वस्त

11)जीवनशैलीच्या अधिकारांबाबत जागृत करणे

12) स्वास्थ्य वृद्धि विकास आणि शांतीचा संपूर्ण विश्वभर प्रसार करणे

13) योगाभ्यासा द्वारे लोकांना उत्तम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची अनुभूती देणे

14) योगाभ्यासात तणावपूर्ण परिस्थितीशी सामना करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताकडे पाहून अनेक विकसनशील देशही प्रभावित झाले आहेत !

swarit

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून ४ आरोपींना जामीन मंजूर

News Desk

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

News Desk