HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई | वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेत राज्य सरकारने यंदाच्या वर्षापासून मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. विधेयकाला आज (२० जून) विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून ते आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक मंजूर केले होते. मात्र विधेयकात काही त्रुटींवर बोट ठेवत यावर्षी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्यास उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलने केली होती.

त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यंदापासूनच आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने अध्यादेश पास केला. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता एसईबीसी आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे-बंगळुरु महार्गावर खासगी बस-ट्रकमध्ये भीषण आपघात, ६ जण जागीच ठार

News Desk

पुण्यातील निर्बंधांबाबत अमृता फडणवीस संतापल्या….!

News Desk

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ

News Desk