HW News Marathi
महाराष्ट्र

आता सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक !

मुंबई | सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेत आज (२० जून) याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. महाराष्ट्रात मराठी शिकविणे हे बंधनकारक राहील. राज्यातील कोणत्याही बोर्डांच्या शाळा असोत, त्यांना मराठी भाषा शिकविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आता कायद्यात बदल करून मराठी भाषा न शिकविणाऱ्या राज्यातील या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक हे मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी (२४ जून) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला, ३ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

News Desk

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

News Desk

“सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येईल मी सांगितलं होतं”,राऊतांचा गौफ्यस्फोट

News Desk