HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले नवजात बाळाचे पालकत्व

परळी | नुकत्याच जन्मलेल्या स्त्री अर्भकाला रेल्वे रुळाजवळील काटेरी झुडूपात टाकून दिल्याची घटना परळी शहरात घडली. हा धक्कादायक व संतापजन प्रकार समोर आल्यानंतर परळीचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत धनंजय मुंडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला असल्याने या नवजात मुलीचे ‘शिवकन्या’ असे नामकरण केले आहे.

रात्रीच्या सुमारास स्त्री जातीचे नवजात अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले होते. इतक्या रात्री नवजात बालकीचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी शोध घेतल्यानंतर हा निर्दयी प्रकार समोर आला. अद्याप हा असंवेदनशील गुन्हा कोणी केला आहे याबद्दल माहिती मिळाली नसून परळी पोलिसांचा तपास सुरु आहे. या गंभीर प्रकाराची दखल सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली असून मुलीचे पालकत्व स्वीकारून पुढील उपचाराची सोय केली आहे.

हा प्रकार ऐकताच आपले मन खिन्न झाले असून सदर मुलीची मी व खासदार सुप्रिया सुळे पूर्ण जबाबदारी घेत आहोत. तिची तब्येत सुरळीत होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालकाश्रमात हलवण्यात येईल, तसेच पुढील संगोपन, शिक्षण ते अगदी लग्नासहित या बालिकेची सम्पूर्ण जबाबदारी आमची असेल असे धनंजय मुंडे यांनी कळविले आहे. दरम्यान, मुलगी वाचवा या आशयाचे त्यांनी ट्विटही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल देशमुख आणि अनिल परब, दोघेही तुरुंगात जाणार”, किरीट सोमय्या

News Desk

Maharashtra Winter Session 2021 : विरोधक महाविकासआघाडी सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेणार

Aprna

कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk