HW News Marathi
महाराष्ट्र

‘सीएए’विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू तर डीसीपी जखमी

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्या (सीएए) विरोधातील आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीत मौजपूरजवळ भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झाले.

दिल्लीच्या उत्तर-पूर्व दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर परिसरात आंदोलकांनी काही घरांनाही आग लावण्यात आली. यामुळे परिसरात तणाव वाढला होता. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात सीएए आणि एनआरसीवरुन आंदोलन सुरु आहे. सीएए-एनआरसी समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने मोठे तणावाचे वातावरण त्याठिकाणी निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. आंदोलकांकडून पोलिसांना लक्ष्य करण्यात येते. पोलिसांवर दारुच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यात येत आहे. तर पोलीस नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

News Desk

सकल मराठा समाजाचा संघर्ष व बलिदानामुळेच आरक्षण !

News Desk

उद्धव ठाकरे आज पक्ष प्रमुख म्हणून विरोधकांना सडेतोड उत्तर देतील –  अरविंद सावंत

News Desk