HW News Marathi
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक

अकोले | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. ‘सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो,’ असे वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकरांनी केले होते. यानंतर इंदोरीकरांनी गर्भलिंग निदानबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्यांना काळे फासू असा इशारा दिला होता.

तृप्ती देसाईंच्या या वक्तव्याच्या संताप म्हणून आज (२३ फेब्रुवारी) बंदची हाक दिली असून फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच, गाड्यांवरही पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान, इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकरांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचे समितीच्या सदस्याने म्हटले आहे.

इंदोरीकरांनी पत्रात व्यक्त केली दिलगिरी

रामकृष्ण हरी

महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

News Desk

प्रताप सरनाईकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,किरीट सौमय्यांसह भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन !

News Desk