HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई | हिंगणघाट जळीत कांडातील आरोप आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी नगराळेंची न्यायालयीन कोठडी ४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी आरोपी नगराळेने आत्महतेचा प्रयत्न केल्याची निव्वळ अफवा असल्याचे ही न्यायालयाने आज (२० फेब्रुवारी) सुनावणीदरम्यान सांगितले.

पेट्रोल टाकून जिवंत जाळून ठार मारणारा

आरोपी विक्कीची काल (१९ फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. आरोपी सध्या नागपूरच्या अंडासेलमध्ये असून थंडीपासून बचाव करण्यासाठी कारगृहातील प्रशासनाने आरोपींना ब्लँकेट देण्यात आले आहे. या ब्लँकेटच्या सह्याने आरोपी नगराळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची न्यायालयात हजेरी लावली.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

वर्धातील हिंगणघाट शहात २४ प्राध्यापिका कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे शिकवायला सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती २० ते ३० टक्के भाजली. नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचारदम्यान पीडितेला सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये !

News Desk

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” सरकारला आमदाराचा घरचा आहेर

News Desk

भेटी लागे जीवा…

swarit