मुंबई । सलग दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणा-या लोकल ट्रेन अर्धा तास मिनिटे उशीराने धावत आहेत. यामुळे कल्याण,ठाकुर्ली आणि डोबिंवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत.
Central Railway CPRO: There was signal issue on downline before Kalyan station (b/w Thakurli&Kalyan). A local train was held up&slow services were diverted on fast downline. Issue rectified. Special services were run from Dombivli. Services expected to be normal soon. #Mumbai pic.twitter.com/HsRFBFE546
— ANI (@ANI) June 17, 2019
सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होणार आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे धीम्या मार्गावर परिणाम झाला आहे. कल्याण दिशेला जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेला येणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कल्याण,ठाकुर्ली आणि डोबिंवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत.
याआधी बुधवारी (१२ जून) कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. तसेच मंगळवारी (११ जून) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल १५ ते २० मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उशिराने सुरू होती. तर सोमवारी (१० जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.