मुंबई | बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) राजभवनावर पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिली शपथ घेण्याचा मान राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची तसेच मंत्रिपदाची चर्चा सुरु होती.
Maharashtra cabinet expansion: Radhakrishna Vikhe Patil & Ashish Shelar take oath as ministers, in presence of CM Devendra Fadnavis in Mumbai. pic.twitter.com/5zurqMZOp3
— ANI (@ANI) June 16, 2019
“यंदाच्या लोकसभेत मी भाजप-शिवसेनेचा उघडपणे प्रचार केला आहे. त्यामुळे, माझा भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि मंत्रिपद कोणाला मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे”, असे स्पष्ट विधान राधाकृष्ण विखे पाटील काहीच दिवसांपूर्वी केले होते. पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरपासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच ४ जूनला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपविला होता. तर त्याच्या काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देखील कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपविला होता. त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडून स्विकारण्यातही आला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा लोकसभा निवडणुकांपूर्वीपासूनच रंगत आहेत. लोकसभेत देखील विखे पाटील यांनी उघडपणे भाजप-शिवसेना युतीसाठी प्रचार केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.