HW News Marathi
महाराष्ट्र

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१५ जून) वाजता दिल्लीत प्रसार माध्यमाशी सांगितले. उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येला जाणार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच हा शपथविधी होण्याची चिन्हे आहेत.

या मंत्रिमंडळाच्या विस्तारात रिपाइंच्या कोट्यातून रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांना मंत्रिपद वर्णी लागली आहे. भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले जाते. याशिवाय संजय कुटे, परिणय फुके यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणारआहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यास भाजपमधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे समजते. अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज ५ वाजता महत्वाची बैठक

News Desk

हिंमत आहे का दंगल करण्याची? इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊतांचा इशारा

News Desk

“आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत?”, मुख्यमंत्री सभागृहात बरसले

News Desk