HW News Marathi
महाराष्ट्र

Live Updates : महाराष्ट्र बंद कोठे काय घडतय

12:41PM, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की भीमाकोरेगांव हिंसा चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले जावे, पंतप्रधानांनीही निवेदन करावे ते मुळीच शांत राहू शकत नाहीत!अशा विषयांवर ते ‘मौनी बाबा’ आहेत.

 

12:24PM, रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक रोखली, दोन्ही दिशांना वाहनांच्या मोठ्या रांगा

11:54 AM, गोरेगाव, मुंबई येथे परिस्थिती गोरेगांवमधील इनोर्बिट मॉलच्या समोर बेस्ट प्रवाशांना आंदोलनकर्त्यांनी बसमधून जबरदस्ती ने उतरवले

11:54 AM, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, गोवंडी आणि जुईनगर इथे रेलरोको

मध्य रेल्वेही विस्कळीत, घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर, दोन्ही बाजूची वाहतूक बंद

11:55AM मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आजच्या परीक्षा रद्द नाही, विद्यार्थ्यांना एक तास उशिरा येण्याची मुभा

11:45AM घाटकोपरमध्ये ईस्टर्न एक्सप्रेसवे ब्लॉक ईस्टर्न एक्सप्रेसवे वर आंदोलन कर्त्यांनी ठाणे दिशे कढील वाहतूक बंद.

11:43AM घाटकोपर ते एअरपोर्ट रोड वर मेट्रो सेवा बंद. मात्र एअरपोर्ट रोड ते वर्सोवा वर मेट्रो सेवा सुरु.

 

11:36 AM महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द, आजची परीक्षा रविवारी 7 जानेवारीला होणार

11:30am आंदोलन कर्त्यांनी प्रवास्यांना बस मधून जबरदस्ती ने उतरावल्याची घटना घाटकोपर आणि गोरेगाव मध्ये घडली आहे,आंदोलन करते फक्त रिकाम्या बस ना सोडत आहेत. वडाळातील बरकत अली रोड देखील बंद करण्यात आला आहे.

11:29am पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा सुरू

नालासोपारा / विरार येथे सकाळी 10.30 वाजल्या पासून रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत -पश्चिम रेल्वे

मुंबई च्या घाटकोपर मधील भट वाडी मध्ये बस वर दगडफेक

 

मिलिंद एकबोटे यांच्या पुण्यातील सिहंगड येथील घराकडे मोर्च्या काढणार – आंदोलन कर्त्याच्या दांडेकर पुलावर घोषणा. पोलीस मोर्चा रोखण्या साठी दांडेकर पुलावर मोठा बंदोबस्त. मिलिंद एकबोटे यांच्या वर दंगल भडकवनाच्या आरोप आहे

रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्याचा प्रयत्न नागपुरातील शताब्दी चौक आणि जयताळा परिसरातील घटना , पोलिस घटनास्थळी दाखल..

 

1) औरंगाबाद जिल्ह्यातील शैक्षणिक दौ-यावर असलेल्या एका खासगी बसमध्ये एका जमावाने दगडफेक केली. गगनगिरी विद्यालयातील सुमारे 40 विद्यार्थी, पंढरपूर तालुके, सोलापूर जिल्हा बोर्डावर होते. घटनास्थळी शिक्षक व एक विद्यार्थी जखमी झाले. औरंगाबादपासून 13 किमी अंतरावर देवगडिया विद्यालय, डोटाबाद किल्लाजवळ आज सकाळी सात वाजता ही घटना घडली.

  • ठाणे येथे कलम 144 लागू

2) कर्नाटकहून महाराष्ट्र राज्य बस सेवा सावधगिरीचा उपाय म्हणून तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे: कलाबुरगीचे दृश्य

 

3) आंदोलन कर्त्यांनी बस आणि रिक्षा यांची हवा सोडली लाल बहादूर शास्त्री मार्ग वर.- मुंबई

3) राज्यातील परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून लोकसभेत निवेदन होण्याची शक्यता, हंसराज अहिर निवेदन देण्याची शक्यता, राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्र्यांची काल फोनवरुन बातचित

4) नालासोपारा मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक वर जमवून रेल रोको केला आहे .प्रशासन आणि सुरक्षा दलांमार्फत रेल्वेचे कामकाज सामान्य करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत – पश्चिम रेल्वे

मुंबई रिक्षा अँड टॅक्सी बंद असल्या मुळे प्रवास्यांचे हाल होत आहेत. मुलुंड मधील रिक्षा चालक च्या माहिती नुसार ‘आम्ही फक्त या बंदला पाठिंबा देत आहोत कारण आम्ही होणाऱ्या नुकसानाला घाबरत आहोत. ते काहीही करू शकतात’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही’, सेनेच्या मंत्र्यांसमोरच इशारा!

News Desk

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

News Desk

रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर आक्षेपार्ह उल्लेख

News Desk