HW News Marathi
मुंबई

मेट्रोच्या कामासाठी पुन्हा एकदा झाडांचा बळी

मुंबई | मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील १००० हून झाडे कापण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा आरे येथील मेट्रो कारशेडसाठी तब्बल ५०८ झाडे कापण्यात येणार आहेत. यात १६२ झाडे मुळापासून कापण्यात येणार असून ३४६ झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. झाडे कापण्याचा हा प्रस्ताव येत्या १४ फेब्रुवारीला पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

सेना-भाजपच्या काळात आरे येथील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांमुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि अशासकीय संस्था आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती. पण पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी ५०८ झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे वृक्षप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मेट्रो कारशेडसाठी किती आणि कोणती झाडे कापली जाणार?

-अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन 2-ए च्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी 32 झाडे कापण्यात येणार असून 90 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

– गोरेगाव पश्चिमेकडील मेट्रो 2-ए प्रकल्पाच्या गोरेगाव आणि बांगूरनगर स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी २९ झाडे कापणे आणि 85 झाडे पुनर्रोपीत करण्याची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन८५कडे मागण्यात आली आहे.

-कांदिवली पश्चिम येथील मेट्रो लाईन 2-ए च्या लालजीपाडा ते महावीरनगर दरम्यानच्या कामात अडथळा निर्माण करणारी ५३ झाडे कापणे आणि २१ झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

-दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची ६३ झाडे कापणे आणि ३७ झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

-लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्चिम येथील ११ झाडे कापणे व ८६ झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat

सॅनिटरी पॅडस वरीलGST(कर) रद्द करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे GST भवनवर आंदोलन

swarit

चैत्यभूमी येथील भीम ज्योतीचे काम रिपब्लिकन सेनेने थांबविले

News Desk