HW News Marathi
देश / विदेश

लश्कर-ए-तोयबामध्ये प्रवेश केलेल्या काश्मिरी युवकाचे सरेंडर

७ दिवसांपुर्वी केला होता लश्करमध्ये प्रवेश, घरी परतण्याच्या आईच्या आवाहनानंतर घरवापसी

लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या काश्मिरी युवकाची घरवापसी झाली आहे. माजीद खान या २० वर्षीय फुटबॉलपटुने गेल्या आठवड्यात लश्कर-ए-तोयबामध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर या युवकाचे एके-४७ सोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते. दहशतवादी संघटनेत मुलाने प्रवेश केल्याचे कळताच त्याच्या घरातील वातावरण ढवळून निघाले. सिक्युरिटी फोर्सेससोबत झालेल्या चकमकीत माजीद मारल्या गेल्याची अफवा देखील पसरली होती. ही माहीती मिळताच माजीदचे वडिल इरशाद खान यांना हार्ट अटॅक आला होता. माध्यमांशी बोलताना माजिदच्या आईने त्याला घरी परतण्याची विनंती केली होती. यानंतर त्याने आईला फोन करुन घरी परतणार असल्याची माहीती दिली. यानंतर माजीदने सिक्युरिटी फोर्सेस समोर सरेंडर केले आहे. साऊथ काश्मिरचे आईजी मुनीर अहमद खान यांनी दहशवादी संघटनांमध्ये गेलेल्या युवकांना हिंसेचा मार्ग सोडण्याचं आवाहन केले आहे. हिसेंचा मार्ग सोडू इच्छिणाऱ्या युवकांचं पुनवर्सन करणार असल्याचही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

News Desk

देवेंद्र फडणवीस पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk