HW News Marathi
महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभागीय अभियंत्याचे दिखाऊ आंदोलन

सभापतींच्या अपिलाला देण्यासाठी उत्तर नसल्याने गाठले पोलीस स्टेशन

उल्हासनगर(गौतम वाघ): भ्रष्टाचाराचा अड्डा असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याच विभागाच्या सभापतीनेच कालेचिटे उघडण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या 15 माहितीच्या अधिकाराचे अपिल शुक्रवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागात होते. त्या अपिलापासुन पळण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत सभापतींचा मुलगा हा शिविगाळ करीत दबाव आणत असल्याचे कारण पुढे केले आहे.

मागील तिन दिवसांपासुन सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबाबत त्यांच्याच विभागाच्या सभापती सरोजिनी टेकचंदानी यानी तोंड उघडत थेट मुख्यमंत्र्यानाही तक्रार केली. त्यानंतर आयुक्त निबांळकर आणि महापौर मीना आयलानी यांनी केलेल्या पाहणीतही रेती ऐवजी ग्रिडचा वापर होत असल्याची बाब समोर आली होती. यामुळे अभियंत्यांवर कारवाईची टांगती तलवार होती. आयुक्त राजेंद्र निबांळकर यांनी शहर अभियंता राम जैसवार यांना सरोजिनी टेकचंदानी यांनी मागितलेली संपुर्ण माहिती अपिलात देण्याची मागणी केली होती. हे अपिल शुक्रवारी दुपारी 3 वाजता होते.

या माहितीमुळे अभियंत्याचा भ्रष्टाचार उघड होणार होता. यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. यापासुन वाचण्यासाठी एका ठेकेदाराकडून कल्पना घेत शहर अभियंता राम जैसवार, कार्यकारी अभियंता महेश शितलानी, उप अभियंता जितु चोईथानी, संदिप जाधव, अश्विनी आहुजा, लिपीक एन.पी.नागदेव, दिप्ती लादे यांनी शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. त्यानी सभापती सरोजिनी टेकचंदानी यांचा मुलगा राजेश टेकचंदानी, नारायण पंजाबी हे दोघे शिविगाळ करीत दबावतंत्र आणतात, अशी लेखी तक्रार करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांची मनधरणी करीत पालीका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांनी अभियंत्याना काम सुरू करण्यास सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत”

News Desk

मुंबई होणार आता खड्डेमुक्त तर कामचुकार कंत्राटदारांवर होणार कारवाई – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

“आता वस्त्रहरण अटळ आहे!”, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

News Desk