HW News Marathi
देश / विदेश

टिपू सुल्तान जयंतीवरुन बेळगावात दोन गट भिडले, जमावाच्या दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी

बेळगाव- टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गट आपआपसांत भिडले. यावेळी दोन्ही गटांनी खडक गल्ली भागात दगडफेक करत हाणामारीदेखील केली. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांळ्या फोडत जमावावर लाठीचार्ज देखील केला. त्यामुळे भडकलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पोलीस आयुक्त आणि उपायुक्त जखमी झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

खडक गल्ली, जालगार गल्ली, घी गल्ली या भागांमध्ये दगडफेकीबरोबर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर हिंसेचे हे लोण चव्हाट गल्ली, भडकल गल्लीसह शहरातील काही भागात पसरले. या घटनाक्रमादरम्यान वीज गेल्यानं गोधळात आणखी भर पडली. सध्या बेळगावात कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच ही घटना घडल्याने पोलिसांची धावपळ झाली. या घटनेनंतर बेळगाव शहरात तणावपुर्ण शांतता असुन सुरक्षेसाठी पोलिसांच्या ८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तामध्ये भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता

News Desk

जाणून घ्या…जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३५ अ’ आणि ‘कलम ३७०’

News Desk

Section 377 | एलजीबीटी समुदायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक

News Desk