HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतींच्या कन्या आहे एअर होस्टेस.. आता तिला मिळाली मोठी जबाबदारी

नवी दिल्लीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कन्या एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत आहे. परंतु आता तिला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ती आता समन्वयकाची जबाबदारी पार पाडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या कामात बदल करण्यात आला आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलेय.

रामनाथ कोविंद यांच्या कन्या स्वाती कोविंद एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून काम करत आहेत. त्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७ आणि बोइंग ७७७ मध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची एअर इंडियाच्या मुख्यालयात समन्वय विभागात बदली करण्यात आली आहे. स्वाती या राष्ट्रपतींच्या कन्या असल्यानं त्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यांसह विमानात काम करू शकणार नाहीत. त्यासाठी अनेक प्रवाशांचे सीट ब्लॉक करावे लागतील आणि तसं करणं शक्य नाही, असं एअर इंडियाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं. दरम्यान,२००७ मध्ये विलिनीकरण झाल्यापासून एअर इंडिया आणि त्यावेळच्या एअर लाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या एकत्रिकरणाचं काम एअर इंडियानं सुरू केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विंग कमांडर अभिनंदन यांची ‘वीरचक्र’साठी शिफारस

News Desk

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

News Desk

अण्णा हजारे यांच्या सामाजिक कामांचा अनुभव हार्दिक पटेलच्या वयाच्या दुप्पट

News Desk