HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकाऱ्यास दंड

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे पारदर्शी कारभाराच्या गप्पा करत असले तरी त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यानी माहिती अधिकार कायद्याचा खेळखंडोबा मांडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्याची मुभा देणाऱ्या ‘आपले सरकार’ या ऑनलाइन ग्रीव्हन्स पोर्टलला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करून संबंधितास दोन वर्षे झुलवल्याप्रकरणी मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकाऱ्यास तब्बल २५ हजार रुपयांचा दंड मुख्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी ठोठावला आहे.

सरकारच्या कारभाराची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, त्यातून नवनवीन घोटाळे उघडकीस येऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा या कायद्याचा खेळखंडोबा करीत लोकांना कसे वेठीस धरत आहे, याचा कटू अनुभव सर्वसामान्य महिती अधिकार कार्यकर्त्यांप्रमाणेच देशाच्या माजी माहिती आयुक्तांनाही घ्यावा लागला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

News Desk

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

News Desk

दारू बंदीच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ

News Desk