HW News Marathi
क्राइम

कठुआ सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरण : ३ जणांना जन्मठेप, अन्य ३ आरोपींना ५ वर्षे कारावास

पंजाब | जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट न्यायालयाने ८ पैकी ६ आरोपीं दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणी तिघांना जन्मठेप आणि अन्य तीन आरोपींना ५ वर्षाची कारणावासची शिक्षा सुनावली आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी आज (१० जून) पठाणकोट न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एक आरोपी अल्पवयीन असून त्याच्याविरुद्धचा खटला अद्याप सुरु झालेला नाही. वयासंबंधीच्या याचिकेवर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. गेल्या १७ महिन्यांपासून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागेल होते.

सांझी राम, आनंद दत्ता, दीपक खजूरिया, विशाल, सुरेंदर वर्मा आणि तिलक राज या सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे पठाणकोट न्यायालया बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आहे. या प्रकरणाची ३ जून रोजी सुनावणी पार पडली.

गेल्या वर्षी १० जानेवारी २०१८ रोजी खेचर चरण्यासाठी आठ वर्षीय मुलगी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचे एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केले आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवले. यानंतर नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. चार दिवस तिला बेशुद्धअवस्थेत ठेवून नंतर तिची हत्या केली. या प्रकरणी सरपंचासह आठ जणांवर आरोप निश्चित झाले होते. १० जानेवारीला मुलीचे अपहरण केले, १४ जानेवारीला तिची हत्या करण्यात आली आणि १७ जानेवारीला तिचा मृतदेह सापडला होता.

जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आरोपी

सरपंच सांझी राम, दीपक खजूरिया आणि ग्रामस्थ प्रवेश कुमार या तिघांना जन्मठेप शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या तिघांना भारतीय दंड न्याय संहितेनुसार कलम १२ओबीनुसार तिन्ही आरोपींवर ३०२ आणि ३७६ बलात्कार, पुरावे नष्ट आणि हात्येचा कट रचण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप ठेवण्यात आले असून या तिघांना प्रत्येकी १ लाख रुपय दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

५ वर्षाचा कारावासाची मिळालेले आरोपी

हेड कॉस्टेबल तिलक राज, असिस्टन सब इनिस्पेकटर आनंद दत्ता आणि पोलीस अधिकारी सुरेश कुमार भारतीय दंड न्याय संहितेनुसार तिघांना न्यायालयाने ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तिन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत देशी दारूचा मोठा साठा जप्त

News Desk

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा

News Desk