मुंबई | घरातील कचरा किंवा घाण तुम्हाला रस्त्यावर टाकायची सवय असल्यास आता सावधान. कारण घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर आता सामान्य नागरिकांना पैसे मोदावे लागणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात येणाऱ्या काळात मुंबईकर भरत असलेल्या टॅक्समध्ये आता कचरा टॅक्सचीही भर होणार आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबईतील ५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी लागू करण्यात आला आहे. मालमत्ता कराची वसूलीही धोरण रखडल्यामुळे राहीली असून जीएसटी प्रणालीमुळे जकातीतून मिळणारे महापालिकेचे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीत सध्या थंडावा आहे. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून उत्पन्नाचे दुसरे पर्याय शोधले जात आहेत. आणि त्यामुळे मुंबईकरांकडून कचरा, मलजल आणि इतर सेवांसाठीचे अतिरिक्त सेवाशुल्क वसूल करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या कर आणि शुल्क अशा स्वरुपात आकारणी होते. परंतु महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य असलेल्या कचर्याच्या निर्मुलनासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक इमारतीतील रहिवाश्यांना या कचर्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.