HW News Marathi
Uncategorized

जेलमधून सुटून आलेल्या संघ कार्यकर्त्याचा खून

केरळ: नुकताच जेलमधून सुटून आलेल्या त्रिसूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. के आनंद असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. २०१४ मध्ये मा.क.पा. कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप के आनंदवर होता. या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. त्रिसूरमध्ये आनंद बाईकवरून जात होता. तेवढ्यात एका कारने आनंदच्या बाईकला धडक दिली. त्यानंतर आनंद खाली पडला, कारमधून काही लोक खाली उतरले. या अज्ञात लोकांनी आनंदवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या के आनंदला रूग्णालयात नेले जात होते, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul Sattar यांची थेट मुख्यमंत्र्याच्याच सचिवांना शिवीगाळ; शिंदे गटात खळबळ

Manasi Devkar

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk

हुसेन बोल्टच्या कारकीर्दीचा पराभवाने अंत

News Desk