HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबई | राज्यभरात दुष्काळ आणि उष्णतेचा कहर सोतत होती. परंतु राज्यात काल (९ जून) ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्री ११च्या सुमारास पावसाच्या रिमझिम सरी कोसळ्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील ३६ हवामान विभागापैकी तब्बल २३ हवामान विभागात कमी तसेच अत्यंत कमी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. केवळ एका विभागात सर्वाधिक जास्त तर ३ विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ९ विभागात सरासरी पाऊस झाला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल !

News Desk

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही! – संभाजीराजे

Aprna

हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी; धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे – अजित पवार

News Desk