HW News Marathi
मुंबई

भावा-बहिणीच्या ताटातुटीबद्दल पंकजांना खंत

पुणे : आम्ही भावा-बहिणीची जशी ताटातूट झाली, तसे कटू अनुभव अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना येऊ नयेत, असे भावूक उद्गार राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहीण आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी भाजपला राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांचे आणि पंकजा मुंडे यांच्यातील सुसंवाद राहिला नाही. अनेकदा जाहीर व्यासपीठावरूनही मुंडे भावंडांनी एकमेकांवर टीकाही केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही भावंडे एकमेकांच्या नात्यांवर बोलण्यास टाळतात. मात्र खूप दिवसांनी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता, त्यांच्यासोबतच्या ताटातुटीचा उल्लेख केला आणि काहीशा भावूक झाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk

सायन स्टेशनजवळ एलबीएस मार्गावर आग, जिवीतहानी नाही

News Desk