HW News Marathi
देश / विदेश

मुखमैथुन गंभीर गुन्हा, आज कोर्टाचा निर्णय

अहमदाबाद(वृत्तसंस्था): मुखमैथुनसाठी पत्नीवर बळजबरी करणे म्हणजे क्रूरतेने केलेला संभोग, वैवाहिक आयुष्यातील क्रूरता किंवा बलात्कार म्हणावा का, या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर गुजरात उच्च न्यायालय फैसला सुनावणार आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये पतीवर खटला चालवला जाऊ शकतो का? याबाबतही न्यायालय निर्णय देणार आहे. मुखमैथुनसाठी जबरदस्ती करत असल्याची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती-पत्नी असल्याने शोषण अथवा बलात्कार होऊ शकत नाही, अशी बाजू त्याने न्यायालयात मांडली होती. तसेच आपल्यावरील आरोप हटवण्यात यावे, अशी मागणीही याचिकेद्वारे केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारकडे उत्तर मागितले आहे. तसेच तक्रारकर्त्या पत्नीला नोटीस पाठवली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर न्यायाधीशांविरोद्धात महाभियोगचा प्रस्ताव व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला

News Desk

राज्यसभेत उपसभापती पदासाठी मतदानाला सुरुवात

swarit

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती – नरेंद्र मोदी

News Desk
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली त्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

News Desk

“हा विषय सरकारचा, मी काही बोलू शकत नाही”, मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk