उरण | खोपटा पुलाच्या एका खांबावर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मजकुरात ‘इसिस’ अबू-बकर-अल बगदादीचा (आयएस) दहशतवादी संघटनेचा उल्लेख असल्यामुळे उरणमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती रविवारी (२ जून) उरण पोलिसांना मिळताच चौकशी आणि तपास सुरू आहे.
उरण तालुक्यात काळ्या रंगाच्या मार्करने तीन भागांत हे संदेश लिहिले आहेत. यात ‘धोनी जन्नत मे आउट’ असा उल्लेख असून, ‘आम आदमी पार्टी’, ‘केजरीवाल’, ‘हाफिज सईद’, ‘रहिम कटोरी’, ‘राम कटोरी’ अशी नावे लिहिली गेली आहेत. तसेच देवनागरी व इंग्रजी भाषेत सांकेतिक आकडे लिहिले आहेत.
याबाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून समुद्रात गस्त वाढविण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.