HW News Marathi
देश / विदेश

निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली। देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्याचा सामना जनता करत आहे. देशाच्या ढासळत्या अर्थ व्यवस्थेवरुन मोदी सरकार टीकेची धनी होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार २.० चा दुसरा आज (१फेब्रवारी) सादर होणार अर्थसंकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमन यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

संसदेत काल (३१जानेवारी) आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांची पातळी गाठेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ९ वाजता अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन होईल. यानंतर अर्थसंकल्प २०२०-२१ सादर करण्यासंदर्भात औपचारिक परवानगी घेण्यासाठी त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती भवनातून अर्थमंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी संसदेत जातील, तिथे अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता लोकसभा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.

१ फेब्रुवारी बजेट मांडण्याची प्रथा ‘या’ नात्याने सुरू केली

२०१६ पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ पासून एक फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट स्वतंत्रपणे मांडले जात असे. परंतु आता दोन्ही बजेट एकत्रच सादर केली जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाराम बापूचा आज निकाल, जोधपूरलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk

अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ED कडून अटक

News Desk

जगात ‘या’ देशात फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले नवीन वर्षाचे स्वागत

Aprna